सफाई कर्मचार्‍यांचे कोणतेही काम प्रलंबित ठेवणार नाही – मुख्याधिकारी मोरे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १८ मे २०२४ | फलटण |
फलटण नगरपरिषद हॉलमध्ये शुक्रवारी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस बैठक संपन्न झाली. यावेळी फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी नगर परिषदेतील सफाई कर्मचार्‍यांचे कोणतेही काम प्रलंबित ठेवणार नाही असे आश्वासन दिले, अशी माहिती मनोज मारुडा व रमेश वाघेला यांनी दिली.

यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मारुडा, पुणे विभागाचे अध्यक्ष राजू मारुडा, फलटण शहरचे अध्यक्ष मनोज मारुडा, उपाध्यक्ष फलटण शहर रमेश वाघेला, लखन डांगे महामंत्री, सूरज मारुडा, चंदूभाई मारुडा, बबलू डांगे, अजय मारुडा, विनोद मारुडा, निखिल वाळा, सारंग गलियल, सौ. मीनल गलियल, सौ. शीतल वाळा, कल्पना वाळा, फलटण नगर परिषदेचे अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी, सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!