
स्थैर्य, सातारा, दि. १३ : HDFC बँकेतर्फे The ART Project या विषयावर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सहभागी कलाकाराने कमीत कमी तीन पेंटिंग ऑनलाइन पाठवायची होती. या स्पर्धेमध्ये राज्यातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते यामध्ये आपल्या डे .ए. सोसायटी पुणेच्या ,न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेतील ४ विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या प्राप्त निकालानुसार पुढीलप्रमाणे विद्यार्थी , पालक व कलाशिक्षक यांनी सहभाग घेऊन सुयश संपादन केले आहे.
यामध्ये पारस विकास वंजारी याच्या तिन्ही चित्रांना पारितोषिके मिळाली आहेत. कु . अन्वेशा बेंद्रे, (इयत्ता सातवी )कु . श्रीया किरण प्रभुणे ,(इयत्ता दहावी ) चि.मंदार महेश लोहार ,(इयत्ता आठवी ) तर पालकांमधून शिल्पकार श्री. महेश लोहार व कलाशिक्षक श्री. घनश्याम महादेव नवले यांना प्रत्येकी एक एक पारितोषिक एचडीएफसी बँकेतर्फे देऊन सन्मानित करण्यात आले आहे.शाळेच्या या उज्वल यशाबद्दल सर्व यशस्वितांचे व मार्गदर्शक कलाशिक्षक घनश्याम नवले व संदीप माळी यांचे शालेय समितीचे अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी शालेय समिती सदस्य श्री अनंत जोशी शालाप्रमुख श्री सुनील शिवले उपशाखाप्रमुख सौ सुनीता राव पर्यवेक्षक सुजाता पाटील व विनया कुलकर्णी तसेच शैक्षणिक व सामाजिक स्तरातून कौतुक अभिनंदन करण्यात येत आहे.