
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 06 : पत्रकार डाईनेल खुडे व जॉन खुडे यांचे वडिल व रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त पी टी शिक्षक सुरेश खुडे वय – ८० यांचे आज मध्यरात्री तामजाई नगर, सातारा येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले.
सयाजीराव विधालय येथे सलग पस्तीस वर्ष त्यांनी पी टी शिक्षक म्हणून सेवा बजावली होती. आज दुपारी एक वाजता भूविकास बँक पाठीमागील दफनभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
