ज्या विद्यार्थ्यांकडे नाही स्मार्टफोन-इंटरनेटची सुविधा, त्यांना शिकवण्यासाठी येतात ‘स्पीकर टीचर’; महाराष्ट्रातील 35 गावात सुरू झाल्या बोलत्या शाळा


 

स्थैर्य, सातारा, दि.८: कोरोनामुळे देशभरातील लॉकडाउन हळूहळू निवळत आहे. अनलॉकमध्ये परिस्थिती पुर्ववत येत आहे. चौथ्या अनलॉकमध्ये जवळ-जवळ सर्वच गोष्टी खुल्या केल्या आहेत. पण, अद्याप शाळा कॉलेजांना उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, परंतू आपल्याकडे असेही काही भाग आहेत, जिथे मुलांना ऑनलाइन शिकवणे स्वप्नासारखे आहे. महाराष्ट्रात अशा भागातील मुलांना लाउडस्पीकरवरुन शिकवले जात आहे. विद्यार्थी या शिक्षकाला ‘स्पीकर टीचर’ म्हणत आहेत.

पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तहसील अंतर्गत येणाऱ्या 35 गावांमध्ये बोलती शाळा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या गावातील अंदाजे 1200 विद्यार्थी या शाळेशी जोडले गेले आहेत. या शाळेची सुरुवात दिगंत स्वराज फाउंडेशनने केली आहे. फाउंडेशनचे डायरेक्टर राहुल टिवरेकर यांनी सांगितले की, ‘लॉकडाउनमध्ये आम्ही या आदिवासी बहुल भागात खाण्या-पिण्याचे सामान आणि औषधे देण्यासाठी यायचो. यादरम्यान अनेकजण आपल्या मुलांच्या शिक्षणामुळे परेशान दिसले. आमच्याकडे इतके संसाधन नव्हते की, यांच्यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेटची सुविधा करतोल. यादरम्यान लाउडस्पीकरवर शिकवण्याची कल्पना सुचली.’

रोज सकाळी अडीच तास भरते शाळा

‘स्पीकर टीचर’ पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांना दररोज सकाळी आठ वाजता शिकवतात. दररोज अडीच तास ही शाळा चालते. दिगंत स्वराज फाउंडेशन स्कूल टीचर्सच्या मदतीने शाळेतील सिलॅबसनुसार स्टडी मटेरियल रेकॉर्ड करुन घेतात. दररोज सकाळी फाउंडेशनचे वॉलेंटियर्स गावा-गावात जाऊन लाउडस्पीकरने मुलांना शिकवतात.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!