
स्थैर्य, फलटण, दि. ४ नोव्हेंबर : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आज, मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात ही पत्रकार परिषद होत असल्याने, यामध्ये प्रलंबित असलेल्या नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यानुसार, ही पत्रकार परिषद मंत्रालयाजवळील सचिवालय जिमखाना येथे होणार आहे. या पत्रकार परिषदेमुळे फलटणसह संपूर्ण राज्याचे लक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लागले आहे.
