महाराष्ट्र विधान परिषदचे सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी स्पष्ट निर्देश


 

स्थैर्य, फलटण दि.१४: कोरोना विषाणू प्रादुर्भाव दिवसें दिवस वाढत असताना केवळ शासन यंत्रणेवर विसंबून न राहता राजकारण, गट तट बाजूला ठेवून संपूर्ण गावाची एकजुट निर्माण करुन या संकटाशी मुकाबला करण्याची आवश्यकता व्यक्त करीत सामाजिक कामाची आवड असणारे गावातील तरुणांना स्वयंसेवक म्हणून बरोबर घेऊन पहिल्या टप्प्यात गावाचे सर्वेक्षण करुन वृद्धांना असलेल्या विविध आजाराविषयी माहिती घेऊन त्यांना उपचाराची व्यवस्था करा, वृद्धांना कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू देवू नका असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.

राज्य शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजनेंतर्गत फलटण तालुक्यातील प्रत्येक गावात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी यासाठी तालुक्यातील तरडगाव, हिंगणगाव व गिरवी या ३ जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आज (सोमवार) आणि उर्वरित साखरवाडी, विडणी, कोळकी, गुणवरे या ४ गटातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांची उद्या (मंगळवार) अनंत मंगल कार्यालय येथे बैठक घेऊन सूचना देण्याचे नियोजन करण्यात आले असून आजच्या बैठकीत अध्यक्ष स्थानावरुन मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे बोलत होते, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपसभापती सौ. रेखाताई खरात, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन व कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंग सांभाळून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!