दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
नवरात्री उत्सव सांगता कार्यक्रमानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात चंडी याग संपन्न झाला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या हस्ते पूर्णाहुती कार्यक्रम संपन्न झाला.
श्री गणेश पूजन व पुण्यवाचन, श्री भवानी मातेची आरती उमेश नाईक निंबाळकर व सौ.निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. श्री चंडी यागाचे पौराहित्य सौरभ वादे, चंदूकाका वादे तसेच अंबाजोगाई येथील वेदशास्ञ संपन्न गणेशकाका जोशी यांनी केले. नवरात्रीनिमित्त नऊ दिवस मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात देवी मातेच्या दर्शनासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती. नवरात्र उत्सव अतिंशय उत्साहात व आनंदात संपन्न झाला.