बिबी प्राथमिक आरोग्य केंद्राला ॲड. किरणताई नलवडे यांची भेट; ‘स्मार्ट आरोग्य केंद्र’ बनवण्याचा संकल्प

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या ॲड. किरणताई नलवडे यांनी बिबी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन सुविधांची पाहणी केली. ग्रामीण नागरिकांसाठी हे केंद्र ‘स्मार्ट’ बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

स्थैर्य, फलटण, दि. 12 मे : सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या ॲड. सौ. किरणताई निलेश नलवडे यांनी आज बिबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सदिच्छा भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची सविस्तर पाहणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी बिबी आरोग्य केंद्राला भविष्यात “स्मार्ट आरोग्य केंद्र” बनवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आयुष्मान भारत कार्डचे वाटप व कर्मचाऱ्यांशी संवाद:

या सविस्तर पाहणी दौऱ्यादरम्यान ॲड. किरणताई नलवडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ‘आयुष्मान भारत’ कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच, त्यांनी आरोग्य केंद्रातील आशा सेविका, डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाशी मोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मान्यवरांची उपस्थिती:

या भेटीप्रसंगी संत कृपा उद्योग समूहाचे संस्थापक विलासराव नलवडे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र काकडे, संजय बोबडे, विशाल बोबडे, गजानन चव्हाण, अनिल बोबडे यांच्यासह बिबी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आरोग्य केंद्रातील उपलब्ध सुविधा, रुग्णांची संख्या आणि संपूर्ण आरोग्य विभागाच्या कामकाजाची सविस्तर माहिती वैद्यकीय अधिकारी विक्रमसिंह खानविलकर आणि सौ. पल्लवी नलवडे यांनी मान्यवरांना दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!