पश्चिम बंगालमध्ये सभा घेण्याची शरद पवार यांची इच्छा; ममतांशी दूरध्वनीवर चर्चा


 

स्थैर्य, दि.२२: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. यादरम्यान इतर अनेक विरोधी नेत्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे.

तृणमूलच्या सूत्रांनी सोमवारी सांगितले की, भाजपविरोधी एक आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नांतर्गत कोलकात्यात विरोधी नेत्यांची एक मोठी सभा आयोजित करण्याचा आमच्या पक्षाचा विचार आहे. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, ‘दूरध्वनीवरील चर्चेत शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांना आपला पाठिंबा जाहीर केला. पवार यांनी बंगालमध्ये येण्याची आणि तृणमूलच्या समर्थनार्थ प्रचार करण्याची इच्छाही व्यक्त केली.’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!