लंडनहून दिल्लीला आलेले 5 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह, नवीन स्ट्रेनचा शोध घेण्यासाठी संशोधन केंद्राकडे नमुने पाठवले

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२२: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन आढळल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात पाच लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या विमानात एकूण 266 लोक होते. पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांचा नमुने संशोधनासाठी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC)कडे पाठवण्यात आले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दिल्लीतील कोविड-19च्या नोडक अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

यादरम्यान मुंबईतही लंडनहून आलेल्या दोन विमानातील प्रवाशांना विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये नेण्यात आले. येथे त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. दरम्यान काही प्रवाशांनी यावर नाराजी दर्शवली आहे. याबाबत आम्हाला याबाबत कोणीच काही माहिती दिली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये अलिकडेच कोरोनाचा नवीन स्ट्रेन (बदलेले रूप) आढळले आहे. हा पहिल्यापेक्षा 70% अधिक संक्रामिक असल्याचे म्हटले जात आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!