उंबर्डेत बेकायदेशीर बैलगाडी शर्यत भरवल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, वडूज, दि.१४: उंबर्डे, ता. खटावच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या बैलगाडी शर्यत भरवणार्‍यांवर वडूज पोलिसांनी कारवाई करून सुमारे 6 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वडूज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उंबर्डे कॅनॉलजवळ मोकळ्या माळावर बेकायदा बिगर परवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली. 

त्याअनुषंगाने त्या ठिकाणावर धनाजी वायदंडे, दीपक देवकर, संग्राम बाबर, संदीप शेडगे, सुतार, संतोष काळे, सागर बदडे, नरळे यांनी त्या ठिकाणी जाऊन या बैलगाडी अड्ड्यावर छापा टाकला. 

या कारवाईत दोन पांढर्‍या रंगाचे पिकअप, सात बैलगाड्या अशा एकूण 6 लाख 70 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर याप्रकरणी अशोक उर्फ पप्पू पवार, सूरज पवार, शंकर पवार (तिघे रा. उंबर्डे), गणेश गिरंजे (रा. नसरापूर, पुणे), संतोष बुधावले (रा. अरफळ कॉलनी, कोरेगाव), अनिकेत घाडगे (रा. ललगुण), प्रकाश जाधव (रा. भाडळे) व अन्य चार ते पाचजणांनी कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करत बैलांना जोरात पळण्यासाठी चाबकाने मारून व शेपटी दाताने चावत व सध्या कोविड 19च्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास धनाजी वायदंडे करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!