आज मलठणमध्ये सावरकर गौरव यात्रा; खासदार रणजितसिंह यांची उपस्थिती


दैनिक स्थैर्य | दि. 02 एप्रिल 2023 | फलटण | सध्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर फलटणमधील मलठण भागामध्ये सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील यात्रेसाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी सावरकर प्रेमींनी सायंकाळी ठीक ६ वाजता मलठण येथील प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल येथे उपस्थित रहावे; असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सदरील सावरकर गौरव यात्रेमध्ये प्रसिद्ध ग्रामीण व्याख्याते प्रा. रवींद्र कोकरे यांचे “मी सावरकर” या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर त्याच ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजकांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!