डॉ. देशपांडे हॉस्पिटलचा शुक्रवार, दि. ७ एप्रिलला उद्घाटन सोहळा


दैनिक स्थैर्य | दि. २ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण शहरात अविरतपणे रुग्णसेवेसाठी समर्पित असणार्‍या डॉ. देशपांडे हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. ७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न होत आहे. हा कार्यक्रम पार्वती प्लाझा, ए विंग, पहिला मजला, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, रविवार पेठ, फलटण येथे होणार आहे.

उद्घाटन सोहळ्यानिमित्त डॉ. देशपांडे हॉस्पिटलला विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. संजयकाका पाटील, तासगाव कवठे महंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती सुमनताई आर. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी (आय.पी.एस.) यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार असून सोहळ्यास फलटण-कोरेगावचे आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी श्री. रुचेश जयवंशी, सातारा जिल्हा पोलीस अधीक्ष समीर शेख, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. संजय गायकवाड, फलटणचे तहसीलदार श्री. समीर यादव, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. तानाजी बरडे, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्री. शिवाजी जगताप, फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. शंकर पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. धन्यकुमार गोडसे, झी २४ तास वृत्तवाहिनीचे सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री. तुषार तपासे व डॉक्टर असोसिएशन फलटण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती शीला दिलीप देशपांडे, श्री. दीपक बोराटे, श्री. धर्मराज देशपांडे, श्री. मयूर देशपांडे, डॉ. प्रियांका देशपांडे व डॉ. देशपांडे हॉस्पिटल स्टाफ यांच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!