
दैनिक स्थैर्य | दि. ११ जानेवारी २०२३ | फलटण | स्वर्गीय यशंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास स्पर्धा २०२३ अंतर्गत जिल्हा स्तरावर गीतमंच स्पर्धेत दुधेबावी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सासकल च्या विद्यार्थ्यांनी मोठा गट विभागात प्रथम क्रमांक पटकावला.हे त्यांनी मिळवलेले यश ना भूतो ना भविष्यती असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.त्यांच्या या यशात शाळेच्या उपशिक्षिका रुपाली शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.तसेच त्यांना शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ, पदवीधर शिक्षक पांडुरंग निकाळजे, सुधीर ढालपे, गावचे व सासकल शाळेचे माजी शिक्षक राजेंद्रकुमार सस्ते यांनी व पालकांनी विशेष मेहनत घेतली व मार्गदर्शन केले.
त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, सौ.शाहीन पठाण सो. गटशिक्षणाधिकारी पं.स.फलटण, श्री.चन्नया घाळय्या मठपती सो. शि.वि.अधिकारी बीट- बरड, गिरवी, दुधेबावी केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार रणवरे, सासकल गावच्या सरपंच उषाताई राजेंद्र फुले,सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक भानुदास घोरपडे, शाळा सुधार संघटन, सासकल जन आंदोलन समिती पदाधिकारी,सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी, शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ, पदवीधर शिक्षक पांडुरंग निकाळजे, सुधीर ढालपे, रूपाली शिंदे, सर्व पालक व सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरावरील गीत मंच स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल ने यापूर्वीच प्रथम क्रमांक मिळवला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन.