दिगंबर आगवणे यांच्या टोळीला मोक्का


दैनिक स्थैर्य | दि. ११ जानेवारी २०२३ | फलटण | दिगंबर आगवणे व त्याच्या पन्नीसह त्यांच्या टोळीतील सातजणांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई झालेली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मोक्का प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

टोळीप्रमुख दिगंबर रोहिदास आगवणे व त्याची पत्नी जयश्री दिगंबर आगवणे (दोघे रा. गिरवी, ता. फलटण), स्नेहल रविंद्र बनसोडे (रा. गिरवी), आदिनाथ काशीनाथ मोटे (रा. सरडे, ता. फलटण), नितीन कालीदास करे रा. वाठारस्टेशन, ता. कोरेगाव), सागर गायकवाड रा. आसू ता. फलटण), अनिल रामचंद्र सरक रा. नांदल, ता. फलटण) अशा सातजणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी त्यांच्यावर मोक्का कारवाईस मंजुरी दिली आहे.

दिगंबर आगवणे याने रणजित संदीप धुमाळ रा. खुंटे, ता. फलटण यांची दिशाभूल करत तसेच त्यांना आगवणेच्या मालकीच्या जे. डी. केमिकल्स अँड फर्टिलायझर कंपनीचे संचालक केले. त्यानंतर खोटी कागदपत्रे तयार करुन धुमाळ यांच्या नावावर कंपनीच्या नावे 2 कोटी 75 लाख रुपयांचे बनावट कर्ज काढले. धुमाळ यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर आगवणे यांना त्यांनाच खंडणी मागितली. खंडणीस नकार दिल्यावर धुमाळ यांचे अपहरण करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडील एक लाख रुपये जबरदस्तीने काढून घेत धुमाळ यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. ही तक्रार दाखल व आधीच्या असंख्य तक्रारीनंतर फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र आणून त्याच्या टोळीची दहशत पसरवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आगवणे व त्याच्या टोळीविरुध्द विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मोक्कांतर्गंत कारवाईचा प्रस्ताव तयार करुन पाठवला. त्याला फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!