वन जमिनीतील बांधकामे नियमित करण्यासाठी सरडे ग्रामस्थांचा मोर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२४ | फलटण |
सरडे (ता. फलटण) येथील वन जमिनीत असणारी बांधकामे नियमित करण्यासाठी सरडे ग्रामस्थांनी मंगळवारी मोर्चा काढला होता. फलटणचे प्रांताधिकारी यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

प्रशासनास दिलेल्या निवेदना ग्रामस्थांनी म्हटले आहे की, सरडे फॉरेस्टमधील जवळपास १२ एकर क्षेत्रावर २०० ते २५० कुटुंबे म्हणजे १४०० ते १५०० एवढी मुस्लीम व हिंदू बांधवांची बांधकामे आहेत. हे लोक १९७२ सालापासून गुण्यागोविंदाने येथे राहत आहेत. या ठिकाणी लोकांनी पक्की बांधकामे केलेली आहेत. या बांधकामाला ग्रामपंचायत कर आकारला जात असून त्याचबरोबर वीज कंपनीकडून सर्व घरांना वीज कनेक्शनदेखील देण्यात आलेले आहे. तसेच ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा नळकनेक्शनही आहे; परंतु काही समाजकटकांनी ही बांधकामे काढण्यासाठी वनमंत्र्यांकडे मागणी केली आहे. ही मागणी पूर्णपणे चुकीची आहे. या मोर्चाद्वारे आमच्या खालील मागण्या आहेत.

वनजमीन अतिक्रमणाच्या नावाखाली छुपा हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून सामजिक सलोखा बिघडवणार्‍या स्वयंघोषित समाजसेवकावर कायदेशीर कारवाई व्हावी. गट नं ६७९ मधील सर्व रहिवाशांचे बांधकाम नियमित करावे. गट नं. ६७९ मधील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे आहेत, अशा प्रार्थनास्थळांना नियमित करावे. गावाला गावठाण उपलब्ध नसल्याने गट नं. ६७९ मधील जागेला पर्यायी जागा म्हणून शेतीमहामंडळाची शिल्लक जमीन राज्य सरकारने केंद्र सरकारला द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या मोर्चा सरडे वनजमिनीत बांधकामे असणार्‍या कुटुंबातील शेकडो महिला व पुरूष सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!