फलटणमध्ये ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी विद्यार्थी रॅलीचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२४ | फलटण |
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण या ठिकाणी फलटण नगरपालिका व मुधोजी हायस्कूल शहरातील सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ हा शासनाचा उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन केले होते.

रॅलीची सुरुवात मुधोजी हायस्कूल येथून करण्यात आली. ही रॅली गजानन चौक मार्गे जाऊन समारोप प्रशालेत करण्यात आला.

या कार्यक्रमाला फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गटशिक्षण अधिकारी व प्रशालेचे प्राचार्य सुधीर अहिवळे सर, उपप्राचार्य सोमनाथ माने सर, मुधोजी विद्यालयाचे उपप्राचार्य देशमुख सर व सर्व न. प. कर्मचारी व सर्व केंद्रप्रमुख, सर्व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!