सांगवी: सोसायटीच्या चेअरमनपदी प्रथमच महिला – निशा जाधव यांची निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

सांगवी विविध कार्यकारी सोसायटीच्या शताब्दी वर्षात ऐतिहासिक निर्णय घेत निशा जाधव यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. प्रथमच महिलेला हा बहुमान मिळाला.

स्थैर्य, सांगवी, दि. 23 जुलै : सांगवी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या शताब्दी वर्षात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सोसायटीच्या १०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलेला चेअरमनपदाची संधी देण्यात आली असून, निशा जाधव यांची या पदावर एकमताने निवड करण्यात आली आहे.

संचालक मंडळ आणि सभासदांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उद्योगपती हनुमंतराव मोहिते आणि नानासो मोहिते यांच्या पुढाकाराने ही निवड करण्यात आली. सर्व संचालक मंडळाने निशा जाधव यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.

याप्रसंगी रामदास ठोंबरे, हरिदास भगत यांच्यासह सर्व संचालक मंडळ, सोसायटीचे सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन निशा जाधव यांना पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी हनुमंतराव मोहिते म्हणाले, “सोसायटीच्या शंभर वर्षांच्या गौरवशाली इतिहासात प्रथमच एका महिलेला चेअरमनपदाची संधी देऊन एक अत्यंत स्तुत्य आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे.” या ऐतिहासिक निवडीबद्दल निशा जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Back to top button
Don`t copy text!