ॲड. विश्वनाथ टाळकुटे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; सोलापुरात रंगणार सोहळा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

मुंबईतील उच्च न्यायालयाचे वकील आणि माऊली फाउंडेशनचे कार्याध्यक्ष ॲड. विश्वनाथ टाळकुटे यांना २०२६ चा राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १८ सप्टेंबर : मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आणि माऊली फाउंडेशनचे कार्याध्यक्ष ॲड. विश्वनाथ टाळकुटे यांची वर्ष २०२६ च्या राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू समाजभूषण पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेशीर क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

सामाजिक आणि कायदेशीर क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान

गेल्या २० वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या कोल्हापूरच्या आविष्कार फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार दिला जातो. ॲड. विश्वनाथ टाळकुटे यांनी वकिली व्यवसायासोबतच माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना कायदेशीर मदत व विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. या योगदानाची दखल घेऊन फाउंडेशनच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.

सोलापुरात भव्य पुरस्कार वितरण सोहळा

हा पुरस्कार वितरण समारंभ रविवारी, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सोलापूर येथील मोरारजी पेठ स्थित मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्रशाला येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमाची नोंदणी सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. या सोहळ्याला टाळकुटे यांनी सहपरिवार व मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन आविष्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!