फलटण: एस.आय.आर. अर्जांसाठी विशेष केंद्र – नागरिकांना आवाहन

ज्या नागरिकांना एस.आय.आर. अर्ज मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या पुढाकाराने फलटणमध्ये विशेष मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 23 जुलै : ज्या नागरिकांना अद्याप एस.आय.आर. चे अर्ज मिळालेले नाहीत, अशा नागरिकांनी आपल्या मतदान ओळखपत्राची छायांकित प्रत आणि त्यावर स्वतःचा मोबाईल क्रमांक लिहून संपर्क कार्यालयात जमा करावी, असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सिद्धाली शहा यांनी केले आहे.

बी.एल.ओ. यांच्याशी थेट संपर्क

नागरिकांनी जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्याशी थेट संपर्क साधला जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांना तात्काळ अर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सिद्धाली शहा यांनी स्पष्ट केले.

प्रशासकीय प्रक्रियेत सुलभता

नागरिकांना आवश्यक असणारे अर्ज सुलभतेने मिळावेत आणि प्रशासकीय प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, या उद्देशाने हे विशेष सहकार्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातील ज्या नागरिकांना अद्याप हे फॉर्म मिळालेले नाहीत, त्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपली कागदपत्रे लवकरात लवकर संपर्क कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!