रोहित शर्मा कमबॅकसाठी सज्ज; लोकेश राहुलचे स्थान अडचणीत; भारत व इंग्लंड आज तिसरा टी-20 सामना


स्थैर्य, अहमदाबाद, दि. १६: दुसऱ्या सामन्यातून गवसलेली विजयाची लय कायम ठेवण्याच्या इराद्याने यजमान टीम इंडिया आपल्या घरच्या मैदानावर उतरणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा टी-२० सामना अहमदाबादच्या नवीन स्टेडियमवर आज मंगळवारी हाेणार आहे. या सामन्यासाठी आता सलामीवीर रोहित शर्माचे यजमान संघात पुनरागमन हाेण्याचे चित्र आहे. यासाठी रोहित शर्माही सज्ज झालेला आहे. दुसरीकडे लोकेश राहुलचे संघातील स्थान अडचणीत सापडले. त्यामुळे त्याला विश्रांती देऊन राेहितचे कमबॅक करण्यावर टीम इंडिया विचार करत आहे.

ईशान किशन व विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडला गत सामन्यातील पराभवाची परतफेड केली. सलामीला आठ गड्यांनी पराभव पत्करणाऱ्या टीम इंडियाने दुसरा सामना सात गड्यांनी जिंकला. त्यामुळे आता हीच विजयाची लय कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे.

राेहित शर्मा गत दाेन सामन्यांपासून संघाबाहेर आहे. तसेच धवनला गत सामन्यात विश्रांती देण्यात आली. ईशान किशनने संधीला सार्थकी लावताना अर्धशतक झळकावले. दुसरीकडे लाेकेश राहुल अपयशी ठरला.

विराटच्या विश्रांतीची चर्चा :
कर्णधार विराट कोहलीला आता विश्रांती देण्याची चर्चा अाहे. त्याने इंग्लंडविरुद्ध सर्वच सामने खेळले. याशिवाय ताे वनडे मालिकेत नेतृत्व करणार अहे. त्यानंतर आयपीएलसाठी ताे मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.

माेईन अलीला मिळेल संधी :
ईशान किशन व यष्टिरक्षक फलंदाज ऋषभला राेखण्यासाठी आता इंग्लंडचा संघ ऑफ स्पिनर ऑलराउंडर माेईन अलीला संधी देण्याची शक्यता अाहे. दुखापतीने मार्क वुड हा खेळू शकला नाही. त्याचे चाैथ्या सामन्यापर्यंत पुनरागमन कठीण अाहे.

भारतीय संघाला दंड
भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात संंथ गोलंदाजी केली. त्यामुळे टीमवर सामना निधीच्या २० टक्के रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यजमान संघाने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. कर्णधार विराट काेहलीने ही चूक मान्य केली. त्यामुळे ही कारवाई झाली.


Back to top button
Don`t copy text!