गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस, पात्र नागरिकांनी लस घेण्याचे केले आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. १६: गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई व त्यांच्या कुटुंबीयांनी आज स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, गृहराज्यमंत्री यांचे फॅमिली डॉक्टर श्री.सुरेश शिंदे व डॉ.भास्कर यादव उपस्थित होते.

लस पूर्णपणे सुरक्षित
मी आज कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जिल्ह्यातील या टप्यातील पात्र लाभार्थ्यांनी लस घ्यावी, असे आवाहनही गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!