स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पशुधनाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रोगनिदानशास्त्रावर संशोधन गरजेचे – पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार

Team Sthairya by Team Sthairya
December 26, 2020
in उर्वरित महाराष्ट्र
पशुधनाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रोगनिदानशास्त्रावर संशोधन गरजेचे – पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार

????????????????????????????????????

ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


स्थैर्य, नागपूर दि,२६ : देशाच्या अर्थव्यवस्थेत पशुधनाचे महत्त्वाचे योगदान आहे. पशुधनावर वेगवेगळ्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. नुकतेच राज्यात लम्पी या त्वचारोगाने डोके वर काढले होते. ते पाहता  भविष्यात पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी रोगनिदानशास्त्रावर (पॅथॉलॉजी) अद्यावत संशोधन गरजेचे असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज केले.

महाराष्ट्र पशुवैद्यक आणि मत्स्यसंवर्धन विद्यापीठ (माफसु) येथे ऑनलाईन आंतरराष्ट्रीय पशुवैद्यक रोगनिदानशास्त्रावर आधारीत दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माफसुचे कुलगुरू डॉ. ए. एम पातुरकर, संशोधन संचालक डॉ. एन. व्ही. कुरकुरे, निबंधक डॉ. सोमकुंवर, डॉ. एस. बी. कविटकर प्रामुख्याने उपस्थित होते.

पशुधन व कुक्कुटपालनातील वाढत्या रोगावरील नियंत्रणात पशुवैद्यक रोगनिदानशास्त्राची भूमिका या विषयावरील  (role of veterinary pathology in controlling emerging and re-emerging diseases of livestock and poultry : an one health approach) आधारीत कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय चर्चासत्र होत आहे. रोगनिदानशास्त्रातील व पशुवैद्यक क्षेत्रातील संशोधक व तज्ञ मंडळी या चर्चासत्रात सहभागी होतील.

कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी लसीवर जगात संशोधन सुरू आहे. मानवासोबत अन्य प्राणी व पशुधनावरही बदलत्या वातावरणाने अनेक नवीन रोगांचा उगम होत आहे. नुकताच राज्यातील पशुधनावर लम्पी नावाचा आजार आढळून आला होता.  त्यावर वेळेवर उपचार केल्याने तो लवकर नियंत्रणात आला. मात्र त्याने गायी, म्हशी या दुधाळ जनावरांची उत्पादकता खालावली होती. अशावेळी पशुवैद्यक व संशोधकांकडून अद्ययावत संशोधनाची व लसनिर्मितीची अपेक्षा असल्याचे श्री. केदार म्हणाले, यापुढे पशुधनावरील संसर्गजन्य आजारांवर लसनिर्मितीवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचनाही त्यांनी केली.

माफसुने संशोधनाला प्राधान्य दिले असून कोविडमध्येही विद्यापीठाने भूमिका बजावली आहे. आयसीएमआरच्या सहयोगाने विद्यापीठात वन हेल्थ सेंटर सुरू केले आहे. पशुधन, कुक्कुटपालनांसह संलग्न शाखांमध्ये माफसुद्वारे काम करणे सूरू असल्याचे कुलगुरू डॉ. ए. एम. पातुरकर यांनी सांगितले.

या कार्यशाळेत नवी दिल्लीवरून आयसीएआरचे उपसंचालक डॉ. बी. एन. त्रिपाठी, सदस्य प्रा .ए. के. श्रीवास्तव यांच्यासह देश विदेशातील 350 हून जास्त विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक देखील यात सहभागी झाले होते.

रोगनिदानशास्त्रात उत्तम काम करणाऱ्या संशोधकांना यावेळी आभासी पद्धतीने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये  के. पी. सिंग (दिल्ली),  एस.  के. मुखोपाध्याय (बंगाल), डॉ. आंनदकुमार, डॉ. एन. व्ही कुरकुरे यांचा गौरव करण्यात आला. माहिती पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण डॉ .एस. बी. कविटकर यांनी तर प्रस्तावना डॉ.ए.पी. सोमकुवर यांनी केली. संचलन डॉ. माधुरी हेडाऊ यांनी तर आभार डॉ. एन. व्ही कुरकुरे यांनी व्यक्त केले.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

औंध येथील मूळपीठ डोंगरावर आज महाश्रमदान;ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार.

Next Post

रस्ते, पाटबंधारे, पशुधन नुकसानीचे फेर आराखडे सादर करण्याची केंद्रीय पथकाची सूचना

Next Post
रस्ते, पाटबंधारे, पशुधन नुकसानीचे फेर आराखडे सादर करण्याची केंद्रीय पथकाची सूचना

रस्ते, पाटबंधारे, पशुधन नुकसानीचे फेर आराखडे सादर करण्याची केंद्रीय पथकाची सूचना

ताज्या बातम्या

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

January 16, 2021
आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

January 16, 2021
फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

पहिल्या दिवशी 3.15 लाखांऐवजी 1.91 लाख लोकांना दिली लस, ठरलेल्या लक्ष्यापैकी केवळ 60%

January 16, 2021
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

January 16, 2021
वाहतूक व्यवस्थेत तात्पूरता बदल

वाहतूक व्यवस्थेत तात्पूरता बदल

January 16, 2021

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सर्वात पहिले घेतली लस, ठाण्यात एका वार्ड बॉयला दिला पहिला डोज

January 16, 2021

व्हॅक्सीनेशन लॉन्चिंगमध्ये मोदींचे डोळे पाणावले

January 16, 2021

हार्दिक आणि कृणाल पांड्याला पितृशोक, हिमांशु पांड्या यांचे हार्ट अटॅकमुळे निधन

January 16, 2021

राजेंद्र फडतरे यांचे निधन

January 16, 2021

सोलापुरात नियोजनबध्द् पध्दतीने लसीकरणास सुरुवात

January 16, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.