औंध येथील मूळपीठ डोंगरावर आज महाश्रमदान;ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार.


स्थैर्य, औंध, दि.२६: येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मूळपीठ डोंगरावरील श्री मूळपीठ देवी मंदिर ते पायथ्याकडील भागाची स्वच्छता रविवार दि. 27 रोजी महाश्रमदानाद्वारे केली जाणार असून  श्रमदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक, परगावी असणारे औंधकर रहिवासी, देवीचे भक्त, विविध युवा मंडळे ,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी,औंध ग्रामपंचायत ,औंधमधील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत तरी या महाश्रमदानास मोठ्या संख्येने
सहभागी  व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
      मागील आठ महिन्याच्या कोरोना काळानंतर  नुकतीच जिल्ह्यातील मंदिरे शासनाने खुली केली आहेत .त्या पार्श्वभूमीवर औंध येथील मूळपीठ डोंगरावरील मंदिर परिसर, 432ऐतिहासिक पायर्या व विविध टप्पे, डोंगरावर असणारा रस्ता मार्ग ,संग्रहालय परिसर तसेच पावतक ,बनबुवा मंदिर परिसर रविवारी सकाळी आठ ते दुपारी एक यावेळेत महाश्रमदानाद्वारे स्वच्छ केला जाणार आहे याबाबतची संपूर्ण तयारी झाली असून  डोंगरावरील कचरा निर्मूलन, प्लास्टिक निर्मूलन केले जाणार आहे तसेच वूक्ष संगोपनावर ही भर दिला जाणार आहे. महाश्रमदानानंतर  श्री भवानी वस्तू संग्रहालय परिसरात येणारे ग्रामस्थ, युवक
भाविक, स्वच्छतादुत यांच्या वनभोजनाची ही दुपारी सोय केली जाणार आहे.

Back to top button
Don`t copy text!