पुणे : तीन मुलींसह आई-वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू, नदीवर कपडे धुताना घडली घटना


स्थैर्य, पुणे, दि.२१: पुण्यातील मुळशी तालुक्यात रविवारी सकाळी नदी किनारी कपडे धुताना तीन मुलांसह आई वडिलांचा बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. घटना सकाळी 11 वाजता घडली. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांचे मृतदेह बाहेर काढून पोस्ट मॉर्टमसाठी पाठवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये शंकर दशरथ लायगुडे (वय 38), पूर्णिमा शंकर लायगुडे (36), अर्पिता शंकर लायगुडे (20), राजश्री शंकर लायगुडे (13), आणि अंकिता शंकर लायगुडे (12) यांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्वांचे मृतदे पोस्ट मॉर्टमसाठी पाठवले असून, पुढील कारवाई सुरू आहे. लायगुडे कुटुंब कपडे धुण्याचा व्यवसाय करतो. मुली पाण्यात पोहत असताना बुडाल्या आणि त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!