
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नामदेव भोसले लिखित ‘मराशी’ या पुस्तकाच्या १४ व्या आवृत्तीचे प्रकाशन राजभवन येथे करण्यात आले.
यावेळी सकाळ डिजिटलचे संपादक सम्राट फडणीस, नामदेव भोसले यांच्या आई शेवराबाई भोसले, बाळासाहेब चवरे आदी उपस्थित होते.
मराशी हे पुस्तक आदिवासी पारधी बोलीभाषा व रूढी परंपरा या विषयावर आधारित असून लेखकाने त्यातून आपल्या यातना व अनुभव मांडले आहेत.
