स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

कोरोना लशीसाठी पंतप्रधानांची धडपड, नरेंद्र मोदी स्वत:च करणार सुरक्षिततेची खात्री

Team Sthairya by Team Sthairya
November 27, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२७: प्रत्येकाचं
लक्ष आता कोरोना लशीकडे लागून आहे. पुढील वर्षात कोरोना लस मिळण्याची आशा
आहे. त्या दिशेनं मोदी सरकारनंदेखील हालचाली सुरू केल्या आहेत. स्वत:
पंतप्रधान नरेंद्र मोदी लशीच्या सुरक्षिततेची खात्री करणार आहेत. यासाठी
देशात जिथं या कोरोना लशी तयार केल्या आहेत तिथं भेट देणार आहेत.

सर्वाधिक आशा आहेत त्या ऑक्सफर्ड,
अ‍ॅस्ट्रेझेनका आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लशीकडून.
त्यामुळे मोदी शनिवार, दि. 28 नोव्हेंबरला पुण्याच्या दौ-यावर येणार आहेत.
सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव
यांनी पंतप्रधानांच्या दौ-यासाठी तयारी सुरू झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं
आहे.

अहमदाबाहून पंतप्रधान मोदींचे शनिवारी
दुपारी 12 वाजून 25 मिनिटांला पुणे विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरूनच ते
थेट सीरम इन्स्टिट्यूटला हेलिकॉप्टरनं रवाना होतील. दुपारी 1 वाजून 05
मिनिटं ते 2 वाजून 05 मिनिटं या एक तासांच्या कालावधीत ते सीरम
इन्स्टिट्यूटला भेट देतील. भेटीदरम्यान ते संबंधित अधिका-यांकडून कोरोना
लशीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ते समजून घेणार आहेत. नंतर ते पुन्हा
विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांला पुणे विमानतळावरून
तेलंगाणाकडे रवाना होतील.

अल्पवयीन भाचीस मामानेच नेले पळवून; दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल

भारतात लशीची दुसरी आशा आहे ते मेड इन
इंडिया कोरोना लस कोवॅक्सिनकडून. जी हैदराबादमधील भारत बायोटेकनं तयार केली
आहे. 29 नोव्हेंबरला रविवारी मोदी भारत बायोटेकमध्ये जाऊन तिथं लशीची
महिती घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-यानंतर ४
डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन तिथं
सुरू असलेल्या कोरोना लशीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.
कोरोना लशीकरणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलण्याची तयारी करत आहे. या संदर्भात
सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली जाऊ शकते. लसीकरण
फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

लसीकरण फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरू
होण्याची शक्यता आहे. आगामी बजेट 2021 मध्ये रोडमॅप जाहीर केला जाऊ शकतो.
या अहवालाच्या मते सरकारने यासंदर्भात संपूर्ण आराखडा तयार केला आहे आणि
अ‍ॅस्ट्रजेनिकामधून मोठ्या प्रमाणात लस घेण्याची तयारी आहे.

असा अंदाज वर्तवला जात आहे की, देशातील
एका नागरिकाला कोरोना लस देण्यासाठी 6 ते 7 डॉलर अर्थात जवळपास 500
रुपयांएवढा खर्च येईल. यामुळेच 130 कोटी लोकांना कोरोना लस देण्यासाठी
सरकारने 500 अब्ज रुपयांचे बजेट निश्चित केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या
शेवटी या अर्थसंकल्पाची व्यवस्था केली जाईल. त्यानंतर लस देताना निधीची
कमतरता भासणार नाही.

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Tags: देश
Previous Post

लाचखोरीत ‘भारत नंबर १’!

Next Post

विनायक शिंदे, सुभाषराव भांबुरे, कु. स्वरा भागवत यांचे शनिवारी यथोचित सत्कार

Next Post

विनायक शिंदे, सुभाषराव भांबुरे, कु. स्वरा भागवत यांचे शनिवारी यथोचित सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Phaltan : त्वरीत पाहिजेत

August 12, 2022

राज्यभरात ‘अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा’ मोहिमेचे आयोजन

August 12, 2022

अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेले

August 12, 2022

परळी खोऱयात पावसाचा हाहाकार अतिवृष्टीमुळे नुकसान: उरमोडीचा विसर्ग वाढवला

August 12, 2022

मुसळधार पावसात मुख्यमंत्र्यांचे महाबळेश्वरकरांनी केले जल्लोषात स्वागत

August 12, 2022

सातारा जिल्ह्याच्या सिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री शंभूराजे देसाई यांचे जंगी स्वागत

August 12, 2022

वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले;गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता निरा नदीत तेहतीस हजार हजार चारशे क्युसेक्स विसर्ग

August 12, 2022

पोलीस बांधवांसाठी ‘बीजराखी’ या अनोख्या संकल्पनेसह रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न

August 12, 2022

पर्यावरण रक्षणासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

August 12, 2022
मान्यवर समवेत जिजाऊ सेवा संघाच्या पदाधिकारी.

जिजाऊ सेवा संघाचे कार्य कौतुकास्पद : पौर्णिमा तावरे

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!