लाचखोरीत ‘भारत नंबर १’!


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२७: लाचखोरीत भारताची परिस्थिती आशिया खंडातील देशांमध्ये सर्वात वाईट आहे. लाचखोरीच्याबाबतीत आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. ‘ट्रान्फरन्सी इंटरनॅशनल’ संस्थेच्या याबाबतचे सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घुसखोरीच्या बाबतीत भारतात घुसखोरीचा दर हा ३९ टक्के इतका आहे. गेल्या १२ महिन्यांमध्ये देशात भ्रष्टारात वाढ झाल्याचं ४७ टक्के लोकांचं मत आहे. तर ६३ टक्के लोकांना वाटतं की भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सरकार चांगलं काम करत आहे. सर्वेक्षणातील माहितीनुसार भारतात सरकारी सुविधांसाठी ४६ टक्के लोक हे वैयक्तिक ओखळीचा वापर करतात. यातील ३२ टक्के लोकांनी लाच दिली नाही तर कामच होत नाही, असं म्हटलं आहे. 

कोरोना लशीसाठी पंतप्रधानांची धडपड, नरेंद्र मोदी स्वत:च करणार सुरक्षिततेची खात्री

शेजारी देशांमध्ये परिस्थिती काय?

भारतानंतर सर्वाधिक लाचखोरी केली जाणा-या यादीमध्ये कंबोडियाचा दुसरा क्रमांक लागतो. यात ३७ टक्के लोक लाच देतात. तर ३० टक्क्यांसह इंडोनेशिया तिस-या स्थानावर आहे. मालदीव आणि जपानमध्ये लाचखोरीचा दर संपूर्ण आशियात सर्वात कमी आहे. या देशांमध्ये केवळ २ टक्के लोकांनी लाच देण्यासाठीची तयारी दर्शविली. विशेष म्हणजे, ट्रान्फरन्सी इंटरनॅशनलने या सर्वेक्षणात पाकिस्तानचा समावेश केलेला नाही. बांगलादेशमध्ये लाचखोरीचा दर भारतापेक्षा कमी २४ टक्के इतका आहे. तर श्रीलंकेत हाच दर १६ टक्के इतका आहे.

सरकारी भ्रष्टाचारामुळे सर्वात जास्त त्रास

ट्रान्फरन्सी इंटरनॅशनलने १७ देशांमधील २० हजार लोकांना काही प्रश्न विचारले. हे सर्वेक्षण जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये घेण्यात आले होते. सर्वेक्षणात सरकारी सेवा देणा-या ६ क्षेत्रांचा समावेश केला गेला होता. सरकारी सेवांमधील भ्रष्टाचारामुळे सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागते असे सर्वेक्षणात दर ४ लोकांमागे तीन लोकांचे म्हणणे आहे. तर तीन लोकांमागे प्रत्येकी एक जण आपला लोकप्रतिनिधी भ्रष्ट असल्याचे मानतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!