फलटण शहर व परिसरात उन्हाळी पावसाची हजेरी


दैनिक स्थैर्य | दि. 18 एप्रिल 2024 | फलटण | फलटण शहर व परिसरात काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वादळ, वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह उन्हाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, सुमारे ३५/४० मिनिटे जोरदार पाऊस पडला.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्याने सकाळी १० पासून अंगाची अक्षरशः लाही लाही होत असल्याने साधारणतः सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रस्त्यांवर अगदी शुकशुकाट जाणवत होता.

थंड पेय, आईस्क्रीम, रसाची गुऱ्हाळे येथेही सायंकाळी ५ नंतरच ग्राहकांची वर्दळ दिसत असे. दरम्यान तालुक्यातील १२७ गा अर्ध्याहून अधिक गावात प्रशासनाने टंचाई घोषित केली असून जनावरे व लोकवस्तीसाठी टँकरद्वारे पि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले आहे, जनावरांच्या चाऱ्याची टंचाईही गंभीर आहे, मात्र अद्याप चारा डेपो किंवा छावण्या सुरु करण्याबाबत कसलीही हालचाल प्रशासन पातळीवर दिसत नाही, आणि लोकप्रतीनिधी लोकसभा निवडणुकीत गुंतले आहेत.

फलटण शहराप्रमाणे चौधरवाडी, भाडळी बु||, गोखळी, गुणवरे, तरडगाव, सासवड, कापडगाव, गिरवी, बिबी, आदर्की खु|| या भागातही पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे.


Back to top button
Don`t copy text!