
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. ११ : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुखर्जी यांनी ट्वीटकरून ही बातमी दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं मुखर्जी यांनी म्हटलं आहे.
“आपण एका दुसऱ्याच कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला करोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे”. अशा आशयाचं ट्विट प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे.
