मसूरमध्ये ट्रान्स्फार्मरवर वीज कोसळल्याने वीज पुरवठा खंडित


स्थैर्य, कराड, दि. 04 : सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामध्ये  ट्रान्स्फार्मरवर वीज कोसळल्याने वाघेश्‍वर व मसूरच्या संजयनगर व शिवाजीनगर परिसरातील काही भागात सुमारे तीन दिवसापासून वीज पुरवठा बंद आहे. वीज खंडित झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी या विभागातील लोकांनी मागणी केली आहे.

सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक पावसाने सुरुवात केली. या पावसात वादळ कमी होते; परंतु अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला. वाघेश्‍वर येथील डीपीवर वीज कोसळली. त्यामुळे या विभागातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला. त्या दिवसापासून बुधवारी सायंकाळपर्यंत वीज न आल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अद्यापही वीज केव्हा येईल याची खात्री नसल्याने लोकांचा स्वतःच्या बोअरवरून पाणी पुरवठा बंद झाला तर विजेवर चालणारी सर्व कामे खोळंबली होती.

वीज वितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी बुधवारी दिवसभर पावसातही ट्रान्स्फार्मर दुरुस्तीचे काम करून वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल वाघेश्‍वरचे सरपंच धीरज जाधव यांनी आभार मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!