
फलटण डॉक्टर्स असोसिएशनने पालखी सोहळ्यानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले. यात ४७० वारकऱ्यांना मोफत औषधोपचार आणि फिजिओथेरपी सुविधा देण्यात आली.
स्थैर्य, फलटण, दि. २३ जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने वारीतील वारकरी भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. कणकवंदना हॉस्पिटलच्या प्रांगणात राबवण्यात आलेल्या या शिबिरात ४७० वारकऱ्यांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळाला.
या शिबिरात वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार आणि फिजिओथेरपीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. संजय राऊत यांच्या हस्ते या वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांनी या उपक्रमाला सदिच्छा भेट दिली.
या आरोग्यसेवेचे नियोजन फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष निनाद दोशी, उपाध्यक्ष चेतन गुंदेचा, महिला उपाध्यक्षा शिल्पा गांधी, सचिव निखिल गांधी आणि खजिनदार सागर तेली यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
यावेळी जे. टी. पोळ, विक्रांत रसाळ, तेजस गांधी, राजश्री नाळे, संतोष गांधी यांच्यासह असोसिएशनच्या अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि कणकवंदना हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवली.