प्राचार्य विश्वासराव देशमुख – एक आनंदयात्री – नाबाद 85

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटणच्या सांस्कृतिक,वाड्ःमयीन,सामाजिक व आर्थिक क्षेत्रात आपल्या नावाचा अमिट ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य विश्वासराव देशमुख. आज त्यांचा 85 वा वाढदिवस. देशमुख सरांचे जीवन म्हणजे एका आनंदयात्रीचे, एका आस्वादक रसिकांचे व शब्दांशी खेळणार्‍या एका कलावंताचे समृद्ध जीवन आहे. अभ्यासू वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. मुधोजी महाविद्यालयाचे 12 वर्ष प्राचार्य होते. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करताना संस्थात्मक पातळीवरील जबाबदार्‍या पार पाडत आहेत. श्रीमंत मालोजीराजे स्मृति प्रतिष्ठान व प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मारक प्रतिष्ठानचे सचिव, नाईक निंबाळकर देवस्थानचे ट्रस्टी, श्रीमंत निर्मलादेवी नागरी सह.पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आणि फ.ए.सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. सरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे पैलू अनेक मान्यवरांनी उलगडलेले आहेत ते असे…

‘श्रीमंत मालोजीराजे’ व ‘श्रीमंत शिवाजीराजे’ हे चरित्रग‘ंथ लिहून फलटणचा इतिहास प्रसिद्ध नाईक निंबाळकर घराण्याचे प्रमाणभूत चरित्रकार असा लौकिक प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी मिळविला आहे. विशेष म्हणजे मी या दोन्ही थोर पुरूषांना पाहिले होते. चरित्र लेखक प्राचार्य देशमुख यांना पाहतोच आहे. हा सगळा योगाचा व माझ्या भाग्याचा भाग आहे.

– प्राचार्य शिवाजीराव भोसले

प्राचार्य विश्वासराव देशमुख सरांच्या भेटीत मला त्यांचा संत वाड्.मयाचा अभ्यास जाणवला. या विषयावरचे त्यांचे चिंतन मला अधिक भावले. लेखन, चिंतन, क्षेत्रात सरांचे असलेले योगदान कौतुकास्पद आहे.

– मा. स्व.आर.आर.पाटील, माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य

तडफदार व्यक्तिमत्त्व,उत्तम प्रशासक,समन्वयकार,संत साहित्याचे अभ्यासक,प्रभावी संघटक, शिस्तप्रिय,अजातशत्रू लेखक, उत्तम वक्ते, अशी अनेक वैशिष्ट्ये विश्वासराव यांची सांगता येतील. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केेलेले कार्य निःसंशय श्रेष्ठ असून,त्यांचे जीवन एक आदर्श व ध्येयवेड्या प्राचार्यांचे उत्तुंग यश आहे.

– मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती तथा विद्यमान आमदार, विधान परिषद

देशमुख सरांची प्राचार्य पदाची कामगिरी मुधोजी महाविद्यालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी अशीच आहे. कोणतेही यश हे सुखासुखी मिळत नसते. त्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागते व कोणत्याही कामात झोकून देण्याची सरांची सवयच त्यांना यशाच्या शिखराकडे घेऊन जाते.”

-मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, चेअरमन, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, फलटण

प्राचार्य विश्वासराव देशमुख यांची आणि माझी भेट नक्की कधी झाली हे सांगणं तसं अवघड आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की विश्वासराव देशमुख यांच्या भेटीनंतर ‘जिंदा दिल माणूस’ नेमका कसा असू शकतो किंवा शकेल याची मला पूर्ण कल्पना आली.

– डॉ.विश्वास महेंदळे,ज्येष्ठ प्रसार माध्यम तज्ञ

प्राचार्य विश्वासराव देेशमुख म्हणजे फलटणच्या शैक्षणिक विश्वातील दीपस्तंभ. श्रीमंत मालोजीराजे स्मृति प्रतिष्ठानचे सचिव म्हणून त्यांनी एक नवी सांस्कृतिक चळवळ उभी केली. त्यामुळे मनोरंजन व प्रबोधन करण्याची श्रीमंत मालोजीराजे यांची परंपरा पुन्हा एकदा फलटणला सुरू झाली.

– अरविंद मेहता,ज्येष्ठ पत्रकार

एका आईने दिलेली शिकवण आयुष्यभर प्रेमाने जपणारे प्राचार्य विश्वासराव देशमुख साक्षात मातृहृदयी विश्वस्त आहेत.

– प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे


Back to top button
Don`t copy text!