फलटण विधानसभेतुन बौद्ध समजाचा आमदार करा; सोशल मीडियावर रंगू लागल्या चर्चा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 15 जुन 2024 | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आता ह्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत बौद्ध समाजाचा आमदार करा; अशी मागणी सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत. जो कोणता पक्ष बौद्ध सामजाचा उमेदवार देईल; त्याच्या सोबतच मतदारसंघातील सर्व बौद्ध समाज असेल; असे मत सुद्धा व्यक्त केले जात आहे.

सन 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. त्यापूर्वी फलटण – खंडाळा विधानसभा मतदारसंघ होता. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून हा मतदारसंघ हा अनुसूचित जाती साठी राखीव करण्यात आला आहे. सन 2009 सालापासून श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वात दीपक चव्हाण हे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

अनुसूचित जातीमध्ये अनेक जातींचा समावेश आहे. त्यामध्ये आता 2024 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आता बौद्ध समाजाचा आमदार करा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

2026 साली मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्याच्या चर्चा सुद्धा दबक्या आवाजात फलटण – कोरेगाव मतदारसंघात सुरू आहेत. त्यामुळे असे जर झाले तर आता म्हणजेच 2024 साली होणारी ही निवडणूक ही अनुसूचित जातीसाठी राखीव म्हणून शेवटची निवडणूक ठरू शकते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!