जनसेवा हीच इशसेवा मानणारे : डॉ. रोहित बोरकर


दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑक्टोबर २०२२ । पुणे । डॉ. रोहित बोरकर हे महाराष्ट्र राज्यात “सत्यशिव ग्लोबल फौंडेशनच्या” माध्यमातून वीस रुपयात रुग्ण सेवा देणारे म्हणून पुणे शहर व परिसरामध्ये सुपरिचित आहेत.

त्यांनी अनेक मोफत शिबीरे आयोजित करून अनेक मोफत शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांना नवजीवन दिले आहे. त्यांचे तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश) येथील दर्शनानिमित्त घडलेला एक प्रसंग.

दि. 20 नोव्हेंबर रोजी एक जेष्ठ नागरिक कुटुंबासमवेत बालाजी दर्शनासाठी आला असता सकाळी दहा चे दरम्यान सी आर ओ ऑफिस जवळ त्याच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला व सदर रुग्ण खाली कोसळून बेशुद्ध झाला. त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमू लागली, कोणी हात पाय चोळू लागले तर कोणी कांदा आणा असे म्हणू लागले. हे करुणामय दृश्य पाहून कुटुंबातील सदस्य घाबरून रडू लागले.

डॉ रोहित बोरकर त्याच मार्गाने दकुटुंबासाह दर्शनाला जात असता त्यांनी गर्दीचे दृश्य पाहिले, व रुग्णाच्या स्थितीचे गांभीर्य पाहून त्वरित त्यांना एका खाजगी वाहनामध्ये टाकून कुटुंबियांना धीर देत त्यांचे जवळील “प्रथमोपचार बॅग “खोलून त्या बेशुद्ध रुग्णाचे नाडी, हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन लेव्हल तपासून उपचार सुरु केले. चार मिनिटांनी रुग्ण हळूहळू शुद्धीवर आल्यानंतर रुग्णालय धीर देत, गर्दीत वाहनाची वाट काढत रुग्ण व त्यांचे कुटुंबियांना बालाजी येथील अश्विनी हॉस्पिटल ला दाखल करून संबंधित डॉक्टरांना त्यांनी केलेल्या प्रथमोपचाराबाबत माहिती देऊन, पुढील उपचार रुग्णवर सुरु करण्यात आल्यानंतरच त्यांनी रुग्णालय सोडले. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी संकटकाळात रुग्णालय जीवनदान दिल्याबाबत डॉ. बोरकर यांचे आभार मानले.

महत्वाची बाब म्हणजे या देवस्थानाला करोडो रुपयांचे दान स्वरूपात मिळते, परंतु या देवस्थाच्या क्लिनिक मध्ये डॉक्टर नाहीत की साधी एन्टीबीओटीक ची गोळी उपलब्ध होऊ शकली नाही. फक्त बॉर्डवर तातडीच्या सेवेसाठी फक्त वेबसाईट नमूद केल्याचे आढळले.

अत्यवस्त रुग्णाचे प्राण वाचविल्याबद्दल तेथे जमलेल्या भक्त समुदायाने डॉक्टरांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!