तालुक्यात आजवर कुणाची ‘गुंडगिरी’ आणि कुणाची ‘विकासकामे’ हे जनतेला ठाऊक : प्रितसिंह खानविलकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 07 जुलै 2024 | फलटण | ‘‘ज्यांनी पालिकेतील आपल्या गटनेतेपदाचा फायदा घेवून भुयारी गटार योजनेमध्ये स्वत:च्या मुलाला सबटेंडर घेतले. जे रोज रात्री लेझीम खेळत घरी जातात. जे मटक्याचे आणि जुगाराचे टेबल चालवतात. ज्यांना फलटणच्या बिअरबार मध्ये आधी रोख पैसे दिल्याशिवाय बसून दिले जात नाही अशा ‘उद्योगी’ माणसानी आमच्या नेतृत्त्वावर बोलू नये. आजवर तालुक्यात कुणी ‘गुंडगिरी’ केली आणि कुणी ‘विकासकामे’ केली हे जनतेला चांगले ठाऊक आहे’’, असा टोला राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी लगावला आहे.

फलटण शहरात दोन युवकांच्यात झालेल्या मारामारी प्रकरणी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या पोलीस प्रशासनाविरोधात भूमिका घेतली होती. त्याविरोधात पत्रकार परिषदेत घेत फलटण पालिकेचे माजी गटनेते अशोकराव जाधव यांनी राजे गटाच्या नेतृत्त्वावर टिका केली होती. जाधव यांच्या टिकेला उत्तर म्हणून प्रितसिंह खानविलकर यांनी सदरचे प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

‘‘श्रीमंत रघुनाथराजे यांच्यावर 307 चा खोटा गुन्हा कुणी दाखल केला होता?, पांडुरंग गुंजवटे, अभिजीत जानकर यांच्यावर खोटे गुन्हे कुणी दाखल केले होते? बीसमरी होऊन केस डिसमिस झाली, उत्तर कोरेगावमध्ये पैसे वाटताना पकडलेला आरोपी सोडून तक्रारदराला २५ दिवस जेल ची हवा खावी लागली, विडणीच्या सरपंचाकडून झालेल्या मारहाणीच्या तक्रारीची दखल न घेण्यासाठी कुणी दबाव टाकला होता? कोर्टानी आदेश देऊन अब्दागिरे प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवायला दोन महिने दिरंगाई केली हे फलटणकरांना चांगले माहित आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे; असे मत यावेळी प्रितसिंह खानविलकर यांनी व्यक्त केले आहे.

आमचे नेतेमंडळी या तालुक्याचे पालक या नात्याने पिढीत जनतेच्या मागे खंभीर उभे राहणाराच, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत रघुनाथराजे यांच्यावर असले फालतू आरोप कारणे हे केवळ हस्स्यासपद आहे. पोलिस प्रशासनाने अश्या प्रकारच्या गंभीर चुक पुन्हा पुन्हा केल्यास जनप्रक्षोभला तोंड द्यावे लागेल; याची नोंद घ्यावी. गुन्हेगारीच्या मुद्यावर तोंडसुख घेण्यापूर्वी विरोधकांनी आत्मचिंतन करावे’’, असेही प्रितसिंह खानविलकर यांनी नमूद केले आहे.

‘‘लोकसभेला आपल्याला जनतेने लाखोंच्या मताधिक्याने नाकारले आहे. विधानसभा निवडणूकीतही जनता तुम्हाला जागा दाखवून देणार आहे. तुम्ही कितीही बेंबीच्या देठापासून खोटे आरोप केले तरी यावेळेस तुम्हाला नक्की नारळ मिळणार आहे. आमचे नेते कायम जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. ज्यांना पाच वर्षाच्या काळात साधा मलठणमधला रस्ता करता आला नाही अशांनी विकासकामांवर बोलणे हास्यास्पद आहे’’, अशी उपरोधिक टिकाही प्रितसिंह खानविलकर यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!