पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर


 

स्थैर्य, सातारा, दि.५: सौदी अरबच्या मदतीवर अवलंबून असणा-या पाकिस्तानवर सध्या वाईट दिवस आले आहेत. कर्जाच्या ओज्याखाली दबलेल्या पाकिस्तानला आता सर्वात मोठा झटका बसलाय. सौदी अरबचे प्रिंस मोहम्मद बिन सलमाननं पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या पाकिस्तानची स्थिती अधिक बिघडणार आहे.

विशेष म्हणजे सौदी अरबने केवळ आर्थिक मदतच बंद केलेली नाही, तर नवं कर्ज देणं थांबवत आधी घेतलेलं कर्जही तात्काळ फेडण्यास सांगितले आहे. त्यामुळे पाकिस्तानवर मोठं संकट कोसळलं आहे. त्यामुळं आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला आता भीक मागण्याचीही सोय राहिली नसल्याचं चित्र आहे. देश गहाण ठेवणं किंवा विकण्याशिवाय पाकिस्तानला काहीच पर्याय नाही, अशी स्थिती पाकिस्तानवर येऊन ठेपलीय. यातही अडचण आहे. कारण आधीच पाकिस्तानवर चीनचं मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. चीनचं कर्ज तर दूरच व्याज भरण्याचीही पाकिस्तानची परिस्थिती राहिलेली नाही. त्यातच आता सौदी अरबनं पाकिस्तानला सर्वात मोठ्या अडचणीत टाकलंय.

सौदी अरबनं ‘चेकबूक डिप्लोमसी’ बंद केलीय. सौदीचे प्रिंस सलमान यांनी अशी सवलत देण्यावरच बंदी आणलीय. याचा सर्वाधिक परिणाम लेबनॉन आणि पाकिस्तानवर झालाय. हे दोन्ही देश सौदीकडून मिळणा-या पेट्रो डॉलरवर उदरनिर्वाह करत होते. पण, आताच्या निर्णयामुळे या देशांना सौदीकडून पैसे मिळणार नाहीत. एवढंच नाही तर आधी घेतलेलं ५ अरब डॉलर्सचं कर्जही फेडावं लागणार आहे.

खरंतर हा निर्णय सौदीनं केवळ पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी घेतलेला नाही. तर आतापर्यंतच्या अनुभवानूसार प्रिन्स सलमाननं हा मोठा निर्णय घेतलाय. पेट्रो डॉलर वाटून सौदीच्या शाही परिवाराला काहीही फायदा झाला नसल्याचं पुढे आलं आहे. त्यांचा प्रभावही वाढलेला नसल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासातून समोर आलंय. त्यामुळं रियादच्या धोरणकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर सौदीनं आपलं हे धोरण बदलण्याचा निर्णय घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!