
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालयात आज (बुधवार) अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 22 एप्रिल : फलटणचे सुपुत्र, ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक मा. श्री. रवींद्र बेडकिहाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात त्यांच्या पत्रकारिता आणि साहित्यिक क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करत त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.
हा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आज, बुधवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० या वेळेत खजिना हौद परिसरातील ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय’, फलटण येथे पार पडणार आहे.
श्रीराम विद्याभवन आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय, फलटण यांच्या मुख्याध्यापकांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या अभिष्टचिंतन सोहळ्यास परिसरातील सर्व सदस्य, नागरिक, हितचिंतक आणि पत्रकार बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
