फलटण: विकास प्रश्नांवर उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे – तोडग्याचे आश्वासन


फलटणमधील नागरी सुविधा, प्रलंबित कामे आणि अडचणींबाबत आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोडग्याचे आश्वासन.

स्थैर्य, सातारा, दि. २२ एप्रिल : फलटण शहर व तालुक्यातील नागरी सुविधा, प्रलंबित विकासकामे आणि प्रशासकीय अडचणींबाबत युवा नेतृत्व अ‍ॅड. अनिकेत राहुल अहिवळे यांनी सातारा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली.

या भेटीदरम्यान फलटणमधील मूलभूत नागरी सुविधा, रखडलेली विकासकामे आणि स्थानिक प्रशासनातील अडथळे याबाबत अहिवळे यांनी शिंदे यांचे लक्ष वेधले. विविध प्रश्नांचा आढावा घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.

फलटण शहर आणि तालुक्यातील काही विकासकामे व नागरी समस्या दीर्घकाळ प्रलंबित असल्याने स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत होती. याच पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!