ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू


 

स्थैर्य, लंडन, दि.१३: ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाच्या कोरोना चाचणीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीला ब्रिटनमध्ये पुन्हा सुरुवात झाली आहे. ब्रिटनच्या मेडिसिन्स हेल्थ रेग्युलेटरी ऑथरटीनं संपूर्ण तपासणी केल्यानंतर कोरोना लस सुरक्षित आढळून आली. त्यानंतर लसीच्या चाचणीला हिरवा कंदिल मिळाला. एका स्वयंसेवकावर लसीचा गंभीर परिणाम दिसून आल्यानं लसीची चाचणी रोखण्यात आली होती.

कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होईल, असा विश्वास एस्ट्राजेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सॉरियट यांनी व्यक्त केला. ‘या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस उपलब्ध होईल. संपूर्ण जगाचं लक्ष या लसीच्या चाचण्यांकडे लागलं आहे. त्यामुळेच या लसीची इतकी चर्चा होत आहे,’ असं सॉरियट यांनी म्हटलं.

एका स्वयंसेवकाला लस टोचल्यानंतर त्याच्या कमरेच्या हाडाला सूज आली. त्यामुळे ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी तातडीनं रोखण्यात आली. या टप्प्यात जवळपास ५० हजारांहून अधिक जणांना लस दिली गेली. सध्या चाचणी अंतिम टप्प्यात आहे. यानंतर सुरक्षितता आणि त्याचा प्रभाव याबद्दलच्या तपशीलाला मंजुरी मिळेल.

भारतातही रोखण्यात आली होती चाचणी

अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं तयार केलेल्या लसीच्या दुस-या आणि तिस-या टप्प्यातील चाचणी १७ ठिकाणी सुरू होती. पण डीसीजीआयनं नोटिस दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटनं चाचणी रोखण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दुस-या टप्प्यातील चाचण्याबाबत तज्ज्ञांमध्येही सकारात्मक वातावरण आहे. तिस-या टप्प्यातील ट्रायल अमेरिकेसह ब्राझील, दक्षिण अमेरिका आणि भारतात होणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!