सातारा येथे पोलीस ग्राऊंडवर पोलिसांसाठी 30 बेडचे स्वतंत्र हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले


 

स्थैर्य, सातारा, दि. 13: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्ययंत्रणेसह इतर प्रशासनावर ताण वाढला आहे. यात मुख्य भुमिका असलेल्या पोलिसांचेही स्वास्थ महत्त्वाचे असून त्यांच्यासाठी कोवीड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले. दरम्यान, राज्य शासनाच्या वतीने येत्या 15 तारेखपासून माझं कुटुंब माझी सुरक्षा ही मोहिम राबवण्यात येणार असल्याचेही ना. पाटील म्हणाले.

सातारा येथे पोलीस ग्राऊंडवर पोलिसांसाठी 30 बेडचे स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन दि. 13 रोजी सायंकाळी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. आ. जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधकारी शेखरसिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, डॉ. संग्राम देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी संजय भागवत, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

                                           

ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेसह इतर प्रशासनावर ताण वाढला आहे. यामध्ये मुख्य भुमिका पोलिस कर्मचार्‍यांची असून त्यांच्यासाठीच या कोवीड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली असून येत्या सहा ते सात दिवसांत हे हॉस्पिटल कार्यान्वित होईल. तसेच सर्वांनी अँटिजन टेस्ट करणेही गरजेचे आहे. या हॉस्पिटलमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण थोडाफार कमी होईल. तसेच या हॉस्पिटलमुळे पोलिसांनाही लाभ होईल. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे हे संकल्पना पूर्णत्वास आली. तसेच राज्य शासनाच्या वतीने येत्या 15 तारेखपासून माझं कुटुंब माझी सुरक्षा ही मोहिम राबवण्यात येणार आहे. या हॉस्पिटलसाठी दोन स्वयंसेवकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे. 

ना. रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ग्रामीण भागातील कोरोनाच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे शोधण्याची गरज आहे. सातारा हे एक कुटुंब आहे. आपण सर्वजण मिळून या कोरोनाच्या संकटाचा सामना करू. कोवीडबरोबर आपण जगायला शिकलं पाहिजे. पोलिसांनी स्वतःला एकटं समजू नये. राज्य शासन त्यांच्या पाठीशी आहे. अशी ग्वाही ना. रामराजे यांनी दिली. 

sकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक मनोज लोहिया म्हणाले, या महामारीच्या काळात पोलीस कर्मचारी अविरत लढत आहेत. या कोवीड फायटर यांच्या आरोग्याचे स्वास्थही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी सातारा येथे उभारलेले कोवीड हॉस्पिटल उपयोगी ठरेल. आतापर्यंत पोलिसांनी चांगला लढा दिला आहे. तसाच लढा आणखी वर्षभर म्हटले तरी आमचे पोलिस देवू शकतात. तथापि, जोपर्यंत कोव्हॅक्सिन येत नाही तोपर्यंत आपल्याला लढावेच लागेल. जिल्हा पोलिस अधीक्षकांचे कौतूक करताना त्यांनी मी जागेची पाहणी करून गेल्यानंतर तीन दिवसांत हॉस्पिटल उभारण्याबाबत व्यवस्था करण्यास सांगितले होते. ही वेळ कमी होती. परंतु, त्यांनीही तिन दिवसातच याचे पूर्ण नियोजन करत आपले नाव तेजस्वी असल्याचे सार्थ करून दाखवले. 

प्रारंभी ना. बाळासाहेब पाटील, ना. रामराजे नाईक-निंबाळकर, आयजी मनोज लोहिया यांच्यास मान्यवरांची हॉस्पिटलची पाहणी केली. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी केले तर आभार अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी केले. 

सातारा जिल्ह्यात पोलिसांसाठी होणारे कोविड सेंटर हे राज्यातील पहिलेच कोवीड सेंटर आहे. याबद्दल पालकमंत्री, आमदार आणि पोलीस अधीकक्ष व त्यांचे सहकारी अभिंनदनास पात्र आहेत. याठिकाणी 30 बेडचे सर्वसुविधांनी युक्त 30 बेडचे हॉस्पिटल होत असून पोलिस दल अथवा त्यांच्या कंटुंबातील कोण आजारी पडल्यास त्यांना चांगले उपचार मिळतील, असे प्रशंसोगद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले. या कार्यक्रमात त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थिती दर्शवून या उपक्रमाचे कौतूक केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!