दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
गणेशोत्सव काळासाठी फलटण ग्रामीण पोलिसांकडून फलटण तालुक्यातील वीस लोकांच्या तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठवण्यात आलेले होते. त्यापैकी १४ जणांच्या तडीपारीचे आदेश २७ ते ३० तारखेपर्यंत प्राप्त झालेले आहेत.
तडीपार झालेल्यांमध्ये आनंदराव सोपान खटके, अक्षय बापूराव उर्फ अजित खटके, संग्राम बापूराव उर्फ अजित खटके, बापूराव उर्फ अजित सोपान खटके, सागर आनंदराव खटके (सर्व रा. खटकेवस्ती, ता. फलटण), प्रणय गोरख शिंदे, नरेंद्र रघुनाथ शिंदे, केशव दौलत शिंदे, ओम नरेंद्र शिंदे (सर्व रा. ताथवडा, ता. फलटण), बापूराव पांडुरंग कांबळे (रा. गुणवरे, ता. फलटण), विशाल बापू घाडगे (रा. निंभोरे, ता. फलटण), भानुदास बापू रणवरे (रा. जिंती, ता. फलटण), सुनील कुंडलिक चांगण (रा. दुधेबावी, ता. फलटण) व विजय बापू कांबळे (रा. निंभोरे, ता. फलटण) यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी प्रस्ताव पाठवून केलेली आहे. तसेच आणखी एक-दोन दिवसात सहा लोकांच्या तडीपारीचे आदेश निघणार असून इतरही लोकांचे हद्दपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत.