सातारा शहरात फक्त एम एच 11चेच वाहन दिसणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १५ : करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरून येणाऱ्यांची दररोज रीघ लागत आहे. शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याकरता सातारा शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन सवय भान, सवयभान ही संघटना सुरू केली आहे. या संघटनांच्या सदस्यांनी शहरात बाहेरच्या जिह्यातील पसिंगचे वाहन दिसताच त्याची तपासणी करून वाहतूक शाखेला कारवाई करायला भाग पाडत आहेत. त्यामुळे शहरात फक्त एम एच 11चेच वाहन दिसणार आहे.

आपले शहर ठेवू सुरक्षित आपले घर राखू सुरक्षित असा अजेंडा ठेवत शहरातल्या नागरिकांना सवयभानचे आवाहन करत संघटना सुरू करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून शहराच्या सुरक्षिततेसाठी राजेंद्र चोरगे, वसंतशेठ जोशी, जयेंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवर व सातारकर यामध्ये सहभागी झाले आहेत. वेगवेगळे उपक्रम कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी राबवण्यात येत आहेत. काही दिवसांपासून शहरात जिह्यात बाहेरील पसिंगची वाहने दिसत आहेत. त्यातील काही वाहने ही परवाना न घेता आले आहेत. कोरोना वाढण्याचा धोका असल्याने बाहेरील जिह्यातील वाहन सातारा शहरात दिसले की त्या वाहनांची तपासणी करण्यात आता  सवयभानने पुढाकार घेतला आहे. मोती चौकात एका चार चाकी वाहनाधारकाची तपासणी केली असता प्रश्नांची बरोबर उत्तरे देता आली नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेकडे सुपूर्द करण्यात आले. सवयभानने घेतलेल्या या कार्याचे सातरकरांकडून कौतुक होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!