
स्थैर्य, सातारा, दि. १५ : सातारा पालिकेच्या धडक पथकाने सोशल डिस्टनन्स न पाळणाया मार्केट याड?, पोवई नाका, मोतीचौक, राजवाडा परिसरातील, गुरुवार परज,बशेटे चौक 501 पाटी परिसरातील दुकानावर कारवाई करून दहा हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.या पथकाने रहिमान बागवान याच्यावर मास्क नसल्याने पाचशे रुपयांचा दंड, नवरंग कापड दुकानांत सोशल डिस्टनन्स पाळले न गेल्याने 1 हजार रुपये दंड, शनिवार पेठेतल्या नागेश्वर ट्रेडर्सचे जितेंद्र गुरसाळे यांच्याकडून हजार रुपये दंड,कच्छि अँडचे जुबेर फजलानी याच्याकडून 1 हजार रुपये दंड, नासिर अल्ली बागवान याच्याकडून 1 हजार, धारेश्वर ट्रेडिंग याच्याकडून 1 हजार रुपये दंड, अमीन ट्रेडर्स मार्केट यार्ड याच्याकडून एक हजार रुपये दंड, म्हसवडकर ट्रेडर्स यांच्याकडून एक हजार दंड, लक्ष्मी नारायण मिल्स यांच्याकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.