दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२४ | फलटण |
खामगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला अजय हनुमंत जाधव (वय २९, राहणार खामगाव) हा दि. १२ जुलै २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ६०० रुपयांची हातभट्टीची दारू बिगरपरवाना विकताना सापडला. त्याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास स.पो.फौ. हजारे करत आहेत.