
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२४ | फलटण |
साखरवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला संदीप केज राठोड (वय २८, राहणार साखरवाडी) हा दि. १२ जुलै २०२४ रोजी दुपारी १.३० वाजता हातभट्टी दारूची चोरटी विक्री करताना आढळला. त्याच्याकडून पोलिसांनी ५०० रुपयांची दारू जप्त केली असून त्याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक तपास स. पो. फौ. हजारे करत आहेत.
