
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १८ जून २०२४ | फलटण |
धुळदेव (ता. फलटण, जि. सातारा) येथे मोटारसायकलचा बँकेचा कर्जाचा हप्ता व लाईट बिल का भरले नाही, असे विचारल्यावरून सख्ख्या भावाने दारू पिऊन येऊन १६ जून २०२४ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घरातील पाण्याची लोखंडी किटली डोक्यात मारून जखमी केले व शिवीगाळ केली, अशी तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात हणमंत आनंदा ठोंबरे (वय २४, रा. धुळदेव, ता. फलटण) यांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ईश्वर आनंदा ठोंबरे (वय १९, रा. धुळदेव, ता. फलटण) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो. हवा. शेंडगे करत आहेत.
