साखरवाडी येथे निर्भयाचा विनयभंग; एकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य | दि. १८ जून २०२४ | फलटण |
साखरवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत १५ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शौचास निघालेल्या निर्भयाचा पाठलाग करत तिला लज्जास्पद बोलून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी निर्भयाने आरोपी मनोज महादेव शिंगाडे (वय ४७, रा. साखरवाडी) याच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोज शिंगाडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपअधीक्षक राहुल धस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!