तमिळनाडूत नवजात बाळांसाठी ‘मामाची सुवर्ण अंगठी भेट’ योजना

दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑगस्ट २०२६ | चेन्नई |
तामिळनाडूतील ‘टीव्हीके’ पक्षाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार, नवजात बाळांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मामाची सुवर्ण अंगठी योजने’च्या अंमलबजावणीसाठी सरकारने पावले उचलली आहेत. या योजनेत १.२८ लाख सोन्याच्या अंगठ्या दिल्या जाणार आहेत. त्यासाठी २२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चार महिन्यांसाठी ही योजना राबवण्यासाठी एक लाखाहून अधिक सोन्याच्या अंगठ्यांची आवश्यकता आहे.

द्रविड आयकॉन सी. एन. अण्णादुराई यांच्या जयंतीचे औचित्य साधून १५ सप्टेंबर रोजी या कल्याणकारी उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या वाढदिवसापासून, म्हणजेच २२ जूनपासून सरकारी रुग्णालयांत जन्माला आलेल्या मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. १,२८,४९९ अंगठ्यांची (२२ कॅरेट) किंमत २२० कोटी रुपये असेल. तमिळनाडू सरकारने एका वर्षासाठी एकूण ४,४१,६६७ अंगठ्यांच्या पुरवठ्याकरिता ७५५.८३ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे.

अंगठ्यांसाठी राज्य सरकारने सध्याच्या बाजारभावानुसार सोन्याचे पैसे देण्याचे मान्य केले आहे. तर जोयालुक्कास ८९,९४९ अंगठ्या आणि कल्याण ज्वेलर्स ३८,५५० अंगठ्या देणार आहे.

Back to top button
Don`t copy text!