अयोध्येच्या राम मंदिराच्या निमित्ताने फलटणमध्ये राम जप व राम रक्षा पठणाचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. 09 जानेवारी 2024 | फलटण | आयोध्या येथे दि. 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम चंद्राच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे फलटणचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे रविवार दि. 14 जानेवारी रोजी सर्व फलटणकारांनी एकत्रित येऊन राम नामाचा जप व राम रक्षा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की; अयोध्या येथे दि. 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने फलटण येथे सर्वांनी एकत्रित येऊन रविवार दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे रामनामाचा जप व राम रक्षा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन कागदावर 108 वेळा “श्रीराम जय राम जय जय राम” असे लिहून त्याखाली स्वतःचे संपूर्ण नाव व पत्ता लिहायचा आहे. आयोध्या येथे होणाऱ्या समारंभाच्या पूर्वी सदरील रामनाम जपाचा रामकुंड पाठवण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!